कमी लागत खर्चात सुरु करा स्वतःचा अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय
दैनंदिन वापरात येणारी अगरबत्ती ही घराघरात दररोज वापरली जाते, त्यामुळे अगरबत्ती ला प्रचंड मागणी आहे. भारत हा एक अध्यात्मिक देश आहे , बाहेरच्या देशातून 80 % अगरबत्ती आयात केली जाते 20% अगरबत्ती भारतात तयार केली जाते. अगरबत्ती साठी मार्केट शोधण्याची गरज नाही तुमच्या गावात,  जिल्हयात, तुमच्यासाठी मार्केट उपलब्ध आहे. 

अगरबत्ती चा व्यवसाय का सुरू करायचा?
अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही घरबसल्या किंवा छोट्याशा जागेमध्ये सुरू करू शकता. अगरबत्ती ही सर्व धार्मिक कार्यामध्ये व घराघरात दररोज वापरली जाते फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा विविध धर्मांमध्ये अगरबत्ती चा वापर होतो.आज जवळपास 90 देशांमध्ये अगरबत्ती वापरली जाते आणि दिवसेंदिवस अगरबत्ती ची मागणी वाढतच आहे. सणसमारंभाच्या दिवसांमध्ये तर अगरबत्ती ची मागणी ही दरवर्षी वाढतच चालली आहे. 
याव्यतिरिक्त आपण हा उद्योग अत्यंत कमी लागत खर्चात सुरू करू शकतो. या करिता जास्त जागा लागत नाही किवा जास्त मजूर पण लागत नाही. अगरबत्ती उद्योग हा सध्या व छोट्याशा मशीनचा वापर करून सुरू करता येऊ शकतो.

अगरबत्ती उद्योग सुरू करण्याकरिता आवश्यक:

उद्योगाचे रजिस्ट्रेशन:
सुरुवातीला आपण उद्योग आधार तयार करून आपला उद्योग सुरू करू शकतो उद्योग आधार तयार करण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही.
उद्योग आधार व्दारे विनामूल्य आपण आपल्या उद्योगाचे रजिस्ट्रेशन करून आपला उद्योग सुरू करू शकतो.
उद्योग आधार कसे काढायचे याची माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://udyogaadhaar.gov.in/UA/UAM_Registration.aspx
या नंतर आपल्या उद्योगाचे GST रजिस्ट्रेशन जवळच्या CSC डिजिटल सेवा केंद्रातून करून घ्यावे.

अगरबत्ती तयार करण्यासाठी आवश्यक मटेरियल:
बांबू स्टीक(अगरबत्ती च्या काड्या), वेगवेगळ्या प्रकारचे पावडर, चारकोल डस्ट, जिगाट पावडर, नरगिस पावडर, लाकूड धूप पावडर, जोस पावडर आणि आवश्यक तेल, पॅकिंग मटेरियल इत्यादी.

अगरबत्ती मेकिंग मशीन:
आपल्या गरजेनुसार उपलब्ध असलेल्या मशीन मधून योग्य ती मशीन घेता येईल. याकरिता योग्य मशीन निवडणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्याकडे दोन प्रकारच्या मशीन मार्केट मध्ये उपलब्ध होतील.
मॅन्युअल , स्वयंचलित अगरबत्ती मशीन. 

मॅन्युअल अगरबत्ती मेकिंग मशीन:
एक अतिशय सोपी ऑपरेटिंग मशीन आहे ज्यामध्ये उच्च उत्पादन, कमी किंमत, टिकाऊ, सुधारित गुणवत्ता आहे, ज्याला विजेची आवश्यकता नाही. अतिशय परवडणार्‍या किंमतीसह हे देखरेख करणे सोपे आहे. आपण या मशीनमधून चांगले उत्पादन आणि उत्कृष्ट गुणवत्तेची अगरबत्ती बनवू शकता. 

स्वयंचलित अगरबत्ती मशीन: 
अधिक उत्पादन मिळविण्यासाठी स्वयंचलित मशीन एक परिपूर्ण निवड आहे. ही मशीन आवश्यकतानुसार आकर्षक डिझाईन्स आणि आकारात उपलब्ध आहे. या प्रकारच्या मशीनद्वारे, आपल्याला 150-180 स्टिक्स / मिनिटांचे उत्पादन मिळेल. यामध्ये गोल आणि चौरस दोन्ही प्रकारच्या काठ्यांचा वापर केला जाऊ शकतो. सामान्यत: या मशीन्स विजेसह चालतात.

अगरबत्ती बनविण्याची प्रक्रिया:
मुख्यतः दोन प्रकारच्या अगरबत्ती तयार केल्या  जातात. एक परफ्युम अगरबत्ती आणि दुसरे मसाला अगरबत्ती. सुगंधित अगरबत्ती तयार करण्याकरिता चारकोल पावडर, गीगाटू, व्हाइट चिप्स इत्यादी पाण्यात मिसळून पेस्ट तयार केली जाते. ही पेस्ट लाकडी फळीवर घेतली जाते आणि हातांनी गुंडाळण्याद्वारे किंवा स्वयंचलित मशीनसह अगरबत्ती स्टिक वर लावली जाते. नंतर कच्च्या स्टिक व्हाईट ऑइल किंवा डाईथिल फाथलेट (डी.ई.पी.) सारख्या इतर सॉल्व्हेंट्ससह पातळ केलेल्या सुगंधी द्रवयुक्त कंपाऊंडमध्ये बुडवल्या जातात आणि त्यांना वाळवुन पॅक केल्या जातात.

Tags:


SIMILAR ARTICLES

Having a Website for your business / company will help you to grow your business faster. If you want to grow a business to generate passive income, you need a website.

Creating a website earlier in 2010 was difficult, costly and time consuming, but now a days in 2019 you can b... Read More


युवा उद्यमियों के लिए एक ऑनलाइन सुविधा - युवा उद्योग क्रांति udyogkranti.com पर आज ही रजिस्टर करें और अपने बिज़नेस का ... Read More


Take charge of what people see when they search for your business. Google My Business gives you the tools to update your Business Profile and engage with your customers from your phone, tablet or computer. Free.
 

BUSINESS INFO: Keep your info updated ... Read More


Most websites working on the internet do not have suitable SEO (Search Engine Optimisation) on the pages as per standards of of the search engines like google, bing, duckduckgo etc. So it becomes difficult to get found in serch engine by keywords, selection of appropriate keywords suita... Read More


Your Business Profile appears right when people are searching for your business or businesses like yours on Google Search or Maps. Google My Business makes it easy to create and update your Business Profile—so you can stand out, and bring customers in.

Read More


कमी लागत खर्चात सुरु करा स्वतःचा अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय
दैनंदिन वापरात येणारी अगरबत्ती ही घ... Read More


Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2019 
प्रधान मंत्री किसान मानधन ... Read More


At Your Service


Register

Register your business today and putup globally !

Verify

Get your account verified by our executive !

Setup

Complete setup your business by our technicion!

Publish

Publish your business today !