लघुउद्योग जे आपण सहज सुरु करू शकता (small business ideas in india)

0

लघुउद्योग हे भारतातील महत्त्वपूर्ण उद्योगांपैकी एक आहे कारण बहुतेक उद्योग लघु स्वरूपाचे आहेत आणि म्हणूनच भारताच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लघुउद्योगांकडून प्राप्त होतो. व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक बहुतेक लोक जास्त प्रमाणात पैसा गुंतवू शकत नाहीत. नवीन उद्गाकरिता बँका आणि इतर वित्तीय / बिगर वित्तीय संस्था कर्ज देऊ शकतात, परंतु कर्ज प्रेत्येकाच्या क्षमतेनुसार मिळते. याउलट व्यवसायाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे गुंतवणूक करण्याची क्षमता असूनही उद्योग व्यवस्थापित करणे सोपे नसते आणि त्यांचे संपूर्ण गुंतवणूक धोक्यात येते यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करून उद्योग सुरु करणे धोकादायक आहे.

म्हणूनच नवीन उद्योजकांनी छोट्या प्रमाणात उद्योगाला सुरवात करावी. जे लोक त्यांचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी भरपुर उत्तम लघु उद्योग आहेत.

small business ideas in india:

1. मेणबत्ती तयार करणे (candle making business):

मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय फक्त ५०० रुपयांच्या गुंतवणुकीने घरून सुरू करता येईल. मेणबत्त्या, विशेषत: सुगंधित मेणबत्त्या अधिक लोकप्रिय होत आहेत आणि हा एक सोपा उद्योग आहे जो लहान प्रमाणात आहे आणि घरातूनच सुरू केला जाऊ शकतो. लोकांनी त्यांच्या घरांच्या सजावटी साठी मेणबत्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे आणि ती काही धार्मिक कार्यात देखील वापरली जाते.

या उद्योगाला लागणाऱ्या महत्वाच्या सामग्रीमध्ये मेण, धागा, साचे, मेणबत्ती धारक, धागा, सुगंध आणि तेल यांचा समावेश आहे.

2. केक बेकिंग व्यवसाय (cake baking):

केक बेकिंगचे व्यवसाय हा राहत्या घरातुन सुरु करता येतो हा व्यवसाय अत्यंत लोकप्रिय होत आहेत कारण अशा व्यवसायात आजपर्यंत कोणताही धोका नाही आणि तो फायदेशीरही आहे. केक बेकिंग व्यवसायात, आपल्याला जवळपासच्या लोकांकडून तसेच बेकरी मधून केक्स बनवण्याचे ऑर्डर प्राप्त होतात आणि ऑर्डर वाढल्यानंतर केक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतो आणि हळुहळु उद्योग वाढवु शकतो.

सध्या जवळजवळ प्रत्येक प्रसंगी केक ऑर्डर केले जातात, अशा प्रसंगांमध्ये वाढदिवस, वर्धापन दिन, ख्रिसमस, नवीन वर्ष आणि इतर कार्यालय उत्सव समाविष्ट असतात.

3. अगरबत्ती उद्योग (agarbatti manufacturing):

अगरबत्ती आणि कापूर ही भारतातील बहुतेक घरांची पारंपारिक आणि धार्मिक गरज आहे. ते नियमितपणे विकत घेतले जातात आणि जर उत्पादनांची गुणवत्ता चांगली असेल तर ग्राहक मिळवणे सोपे आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक अगरबत्ती व कापूर बनविण्याकरिता मशीनसह साहित्य खरेदीसाठी 50,000 रुपयांपासून सुरू होते.

अगरबत्ती उद्योगाबद्दल अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

4. लोणचे(pickle business):

भारतात, विशेषत: देशाच्या दक्षिणेकडील भागात, जवळजवळ प्रत्येक जेवणात लोणचे असते. लोणचे भारतीय घरात अत्यंत लोकप्रिय आहे. पूर्वी लोक घरी लोणचे बनवत असत आणि संग्रहित करत असत, परंतु सध्याच्या कॉर्पोरेट जगात जेथे जवळजवळ प्रत्येकजण काम करीत आहे, लोणची बनवण्याची वेळ मिळणे जवळजवळ अशक्य झाले आहे.यामुळेच दुकानांमधून तयार लोणचे प्रसिद्ध होत आहे आणि घरगुती लोणचे ग्राहकांची पहिली पसंती आहे. घरगुती लोणचे अधिक आरोग्यदायी आणि विश्वासार्ह असते. सरासरी रु. 20,000 ते 25,000 रू. गुंतवणुक करून घरगुती लोणच्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

5. जूट बॅग(jute bag manufacturing):

जूट पिशव्या बायोडेग्रेडेबल आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या आहेत आणि त्या लोकांना दररोज फायदेशीर ठरतात. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या आहेत आणि लोक पर्यावरणास अनुकूल उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे जूट पिशव्याला मागणी आहे. डिझाइननुसार त्यांची किंमत ठेवली जाते – पिशव्या जितकी जास्त फॅशनेबल असतील तितके जास्त पैसे देण्यास तयार असतात. जूट पिशव्या तयार करणे आणि त्या विक्री करणे फायद्याचे ठरू शकते

6. हॅन्डमेड चॉकलेट(chocolate business):

मुलांसाठी आणि प्रौढांसाठी चॉकलेट सर्वात आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. बहुतेकदा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. घरगुती चॉकलेट हा एक उत्तम व्यवसाय आहे कारण लोकांना घरी बनविलेले वेगवेगळे फ्लेवर्ड चॉकलेट आवडते.

सुमारे 40 ते रू. ५० हजार रुपयांची कच्चा माल खरेदी करण्यासाठी व पॅकेजिंगसाठी आवश्यकता असेल. या व्यवसायाचा फायदा हा आहे की तो घरी केला जाऊ शकतो आणि बराच काळ चॉकलेट साठवून ठेवता येतात .

7. पापड आणि इतर स्नॅक्स(papad business at home):

पापड आणि इतर भाजलेले / तळलेले स्नॅक्स जसे की चिप्स, पापड यांना देशात जास्त मागणी आहे. या व्यवसायासाठी रु. 30,000 ते 40,000 रुपये गुंतवणुकीची आवश्यकता आहे हा व्यवसाय घरी केला जाऊ शकतो.